अजित पवारांना अखेरची सलामी देताना मिसफायर शहा, फडणवीस, शिंदेंसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गंभीर प्रकार; व्हिडिओ व्हायरल

KHOZ MASTER
1 Min Read

पुणे प्रतिनिधी :

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी शासकीय सलामीदरम्यान एका पोलिस कर्मचाऱ्याकडून चुकून गोळी सुटल्याने कार्यक्रमात तणाव निर्माण झाला. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की गोळी लोड करताना मिसफायर झाली आणि सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.
पोलिस प्रशासनाच्या माहितीनुसार, सलामीसाठी डमी काडतूस वापरले जातात आणि ही घटना अपघाती आहे. तरीही, अशा शिस्तबद्ध शासकीय कार्यक्रमात ही चूक गंभीर मानली जात आहे. प्राथमिक तपासानंतर संबंधित पोलिसावर विभागीय चौकशी होऊ शकते. या चौकशीत निष्काळजीपणा, नियमभंग किंवा प्रशिक्षणातील त्रुटी आढळल्यास नोटीस, वेतनवाढ रोखणे, बदली किंवा निलंबन अशी कारवाई होऊ शकते.
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून, अनेकांनी याला फक्त अपघात मानले आहे, तर काहींनी पोलिस दलाच्या शिस्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रशासनाने या घटनेची अंतर्गत चौकशी करून नेमकी चूक आणि जबाबदारी निश्चित करण्याची तयारी सुरू केली आहे.

0 9 7 3 9 7
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *