लोणार प्रतिनिधी :
नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार संघाच्या बैठकीत भाई सुरेश मोरे यांची अध्यक्षपदी आणि शेख वसीम भाई यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने तालुक्यातील पत्रकार समाजात समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाई सुरेश मोरे हे अनेक वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय असून त्यांनी नेहमीच निर्भीड, प्रामाणिक आणि समाजाभिमुख पत्रकारिता केली आहे. संघटनात्मक कामकाज मजबूत करण्यासाठी सातत्याने लढा देत, नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करणे आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे हे त्यांच्या कार्याचे ठळक वैशिष्ट्य राहिले आहे.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाई सुरेश मोरे म्हणाले, “पत्रकार संघ हा फक्त संघटना नाही, तर पत्रकारांच्या हक्कांचे आणि स्वाभिमानाचे व्यासपीठ आहे. सर्व पत्रकारांना सोबत घेऊन संघ अधिक सक्षम, प्रभावी आणि एकसंध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”
जिल्हा व तालुक्यातील अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या निवडीचे अभिनंदन केले. शेख चांद भाई, राजेश पठाण, संतोष पाटील, शेख वशिम भाई, शेख निसार भाई, इम्रान भाई, मुकद्दर भाई, शेख मोईन भाई, राजेश अवचार, ज्ञानेश्वर घुडकेकर, विनोद पाटील तेजनकर यांसह अनेकांनी त्यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संघ अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
भाई सुरेश मोरे यांच्या अध्यक्ष पदाच्या निवडीमुळे पत्रकारांच्या समस्यांना न्याय मिळेल, संघटनात्मक कामकाजाला नवी दिशा मिळेल आणि पत्रकारितेच्या मूल्यांना अधिक बळकटी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Users Today : 16