बुलढाणा : पहिली ‘विद्यार्थी पक्षी संमेलना’ – निसर्ग संवर्धनासाठी विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :

निसर्ग आणि पक्षी संवर्धनाचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवण्यासाठी बुलढाण्यात रविवारी, १ फेब्रुवारी रोजी पहिल्या ‘विद्यार्थी पक्षी संमेलना’ चे आयोजन करण्यात आले. हा अनोखा उपक्रम बुलढाणा व अकोला वनविभाग, निसर्ग कट्टा (अकोला) आणि मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.
सन्मानाच्या यादीत दोन विशेष पुरस्कार दिले गेले:
पक्षी मित्र कृतज्ञता पुरस्कार – राहुल हरी चव्हाण (सुंदरखेड, बुलढाणा), घराभोवती चिमण्यांसाठी निवारा व चारापाण्याची सोय करून पक्षी संवर्धनासाठी गौरवले गेले.
दीपस्तंभ पुरस्कार (बाल पक्षीमित्र) – मल्हार विनायक हिंगणे, लहान वयात पक्षी निरीक्षण, नोंदी आणि कॉमिक्सद्वारे जनजागृती केल्याबद्दल सन्मानित.
सन्मेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे एका पर्यावरण स्पर्धेद्वारे विद्यार्थी अध्यक्षाची निवड करण्यात आली, ज्यात कु. सईशा स्वप्नील काळवाघे हिने बाजी मारत पहिल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. याबद्दल उपवनसंरक्षक श्रीमती सरोज गवस, डॉ. वैशाली गजेंद्र निकम आणि अमोल सावंत यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.
सन्मेलनाच्या औचित्याने १ व २ फेब्रुवारी रोजी जांभरुण रोडवरील ‘मयूर कुंज’ येथे विशेष प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
डॉ. गजेंद्र निकम – पक्षी छायाचित्रे (Wildlife Photography)
डॉ. विनायक हिंगणे – पक्षी रेखाचित्रे
उद्घाटन – शीलाताई किरण पाटील यांच्या हस्ते
वेळ – सकाळी ११:३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत
सन्मेलनामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी उत्सुकता असून आयोजकांनी जास्तीत जास्त रसिकांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

0 9 5 5 4 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *