चिखली : श्री प्रभू विश्वकर्मा प्रगटदिन व उद्योग दिनाचे भव्य आयोजन, सुतार समाजाचा उत्साह उमटला

KHOZ MASTER
1 Min Read

हिवरा आश्रम प्रतिनिधी :

श्री विश्वकर्मा जयंती व उद्योग दिन निमित्त पांचाळ सेवाभावी ट्रस्ट, चिखली यांच्या वतीने भव्य कार्यक्रम शनिवार, ३ जानेवारी रोजी विश्वकर्मा मंदिर, खंडाळा रोड, राधाबाई खेडेकर शाळेसमोर वायझडी तलावाजवळ आयोजित करण्यात आला आहे.
उत्सवाची सुरुवात सकाळी ९ वाजता प्रभू विश्वकर्मा पूजन ने झाली, त्यानंतर १० वाजता ध्वजपूजन, ११ वाजता शोभायात्रा, दुपारी १२.३० वाजता समाजातील गुणवंतांचा व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार याप्रमाणे कार्यक्रम पार पडला.
दुपारी १.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम खेळ पैठणीचा आयोजित करण्यात आला, ज्यात आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते ५ भाग्यवान विजेत्या महिलांना पैठणीचे वितरण करण्यात आले.
दुपारी ३.३० वाजता महाप्रसादाचे वितरण, तर सायंकाळी ५.३० वाजता महिलांसाठी हळदी- कुंकू कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आ. श्वेताताई महाले पाटील उपस्थित होणार होत्या. तसेच, विशेष उपस्थिती म्हणून माजी आ. डॉ. संजय रायमुलकर, नगर परिषद अध्यक्षा नांदुरा मंगलाताई मुन्हेकर, प्रमुख उपस्थिती चिखली नगर परिषद अध्यक्ष पंडीतराव देशमुख, तसेच प्रमुख अतिथी म्हणून पाणीपुरवठा सभापती गुरूदत्त सुसर, नगरसेविका ज्योतीताई वाळेकर, नगरसेवक रत्नदीप शिनगारे, नगरसेविका सौ. स्वातीताई लहाने, माजी नगरसेवक सुभाषआप्पा झगडे यांची उपस्थिती लाभली.
श्री विश्वकर्मा पांचाळ सेवाभावी ट्रस्ट, चिखली यांनी सुतार समाजाच्या बांधवांना या उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे

0 9 7 3 9 8
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *