डोणगांव : संजीवनी सेवाभावी परिवाराचा 27 वा वर्धापन दिन – सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान

KHOZ MASTER
2 Min Read

डोणगांव प्रतिनिधी :

सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संजीवनी सेवाभावी परिवार ने आपला 27 वा वर्धापन दिन साजरा करत विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान करण्याची तयारी केली आहे.
दि. १ फेब्रुवारी रोजी राजुरकर मंगल कार्यालय येथे आयोजित या वर्धापन दिनी काही खास पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत:
स्व चतुराबाई सदाशिव पळसकर स्मृती प्रित्यर्थ राजमाता मा जिजाऊ पुरस्कार – रिसोड तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर
स्व माधवराव उल्हामाले स्मृती संजीवनी पुरस्कार – छत्रपती संभाजी नगरचे ग्रामीण पोलीस स्टेशन सहा पोलीस निरीक्षक भारत मोरे, साहित्यिक प्रा. गोविंद गायकी, कृषी भूषण प्रविण गजानन सुर्वे, विनोद गणपतराव बाजड
स्व डॉ. जगदीश बिडवई स्मृती संजीवनी दर्पण पुरस्कार – जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, गजानन देशमुख, रविंद्र वाघ, शे. सादीक कुरेशी, निलेश काळे, नवल राठोड
स्व वामनआप्पा फिसके स्मृती पुरस्कार – गुणवंत विद्यार्थ्यांना गौरव
संजीवनी सेवाभावी परिवाराचे अध्यक्ष डॉ. गजानन उल्हामाले, राजेंद्र पाटील पळसकर, दिपक आखाडे, जयंतबाप्पु बिडवई, मधूकरकराव घिरके, अनील आवटी, सुरेश फिसके, विनोद खंडारे, बबनराव पळसकर, आसीफ खान, सुरेन्द्र सिंह चव्हाण, डॉ. शिवाजीराव बाजड, गजानन खिल्लारी, हितेश सदावर्ते, योगेश सारडा, हमीद मुल्लाजी, किरण देवकर, डॉ. नकुल फुले, गणेश वाघमारे, डॉ. ओम विजय काळे, गणेश पळसकर यांनी परिसरातील सर्व मान्यवरांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या वर्धापन दिनामुळे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान करणाऱ्यांचे गौरव करण्यात येणार आहे, तसेच स्थानिक समुदायामध्ये उत्साह आणि प्रेरणा निर्माण होईल.

0 9 7 3 9 8
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *