बुलढाणा प्रतिनिधी :
इस्लाम धर्मातील पाच कर्तव्यांपैकी एक महत्त्वाचा आणि पवित्र कर्तव्य असलेली हज यात्रा 2026 साठी जिल्ह्यातील अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्हा हज समितीचे सदस्य काझी रईसोद्दीन यांनी सांगितले की, शारीरिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम मुस्लिमांनी आयुष्यात किमान एकदा हज यात्रेचे कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे.
यात्रेला जाण्यापूर्वी, जिल्ह्यातील 300 हून अधिक हज यात्रेकरूंना आरोग्य विभागाने आवश्यक लसीकरण केले. या लसीकरणात पोलिओ व मेंदुज्वराची लस देण्यात आली असून, प्रत्येक यात्रेकरूला लस घेतल्याचे प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले.
सदर लसीकरण कार्यक्रमात डॉ. प्रविण डॉ.अर्शद डोंगरे, डॉ. कमर खान, डॉ. जुनेद मिर्झा, डॉ. शिफाअत यांनी आरोग्य व्यवस्थापन केले. जिल्हा शल्य चिकित्सा अधिकारी डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी सांगितले की, हज यात्रेदरम्यान गर्दीमुळे विविध रोगांचा धोका असतो, त्यामुळे लसीकरण अत्यावश्यक आहे.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी इराफान उल्लाह खान, हाजी महेबूब खान, हाजी सत्तार, फारुख शेख, हाजी रईसोद्दीन काझी, सैय्यद दाऊद, हाजी छोटू चौधरी, हाजी मोसीन, हाजी सरफराज देशमुख, सईद ठेकेदार, तलाह अहमद यासह अनेकांनी परिश्रम घेतले.
यापूर्वी हज यात्रेला जाणाऱ्या नागरिकांना आरोग्य विभागाकडून आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत. या कार्यक्रमामुळे हज यात्रेकरू संपूर्णपणे सुरक्षित आणि तयार आहेत, असे विभागाने सांगितले.
Users Today : 17