पुसद प्रतिनिधी :
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरातील वनविभाग कार्यालय समोर भीषण रस्ता अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या सरकारी गाडीला ट्रॅक्टरची जोरदार धडक बसली. अपघाताचे कारण ट्रॅक्टरचा टायर फुटल्याचे सांगितले जात आहे.
या अपघातात तहसीलदार रेणुकादास देवणीकर, त्यांचा चालक आणि शिपाई असे तिघे जखमी झाले आहेत.
तहसीलदार यांच्यावर अर्धापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इतर एका जखमीवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत.
घटनास्थळी तात्काळ मदत कार्य सुरु करण्यात आले असून, अपघाताची अधिक माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
Users Today : 17