मुक्ताईनगर : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त महिला सर्परक्षक वनिता बोराडे यांचा विद्यार्थ्यांसाठी सर्प संवर्धन शिबिर

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित उपक्रमांतर्गत जगातील पहिली महिला सर्परक्षक आणि नारीशक्ती – राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त हिवरा आश्रम, बुलढाणा येथील वनिता बोराडे यांनी कला, वाणिज्य महाविद्यालय कुऱ्हा काकोडा, श्री शिवाजी हायस्कूल वडोदा आणि नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथे विद्यार्थ्यांना सर्प संवर्धन व सापांबाबत सखोल माहिती दिली.
यावेळी वनिता ताईंच्या पती डी. भास्करराव बोराडे यांनी सुद्धा सापांच्या विविध जाती व त्यांच्या जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रामध्ये ५२ सापांच्या जाती, त्यापैकी ४० बिनविषारी आणि १२ विषारी आहेत. त्यातील ८ जाती घनदाट अरण्यात तर ४ जाती गावाजवळील नदी, तलाव आणि शेती परिसरात आढळतात. तसेच साप चावल्यास काय करावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले गेले.
वनिता ताईंनी विद्यार्थ्यांना सांगितले की, साप घाबरट प्राणी आहे आणि तो कुणाच्याही मागे धावत नाही, तसेच साप दूध पीत नाही. हे सर्व माहिती अध्यात्मिक, प्राचीन व आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून दिली गेली.
या उपक्रमात उपस्थित होते:
कला वाणिज्य महाविद्यालय – अध्यक्ष श्री प्रमोद शिवलकर, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र फडके, सचिव सौ. गौरी फडके, सदस्य श्री निवृत्तीभाऊ पाटील, श्री सुनील चौधरी, प्राचार्य डॉ. पी. व्ही. पिंगळे, प्रा. सचिन जोशी, प्रा. मनोज वाघ, श्री पी. एम. घोगरे
श्री शिवाजी हायस्कूल वडोदा – मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर वनारे, शिक्षक श्री एस. आर. मराठी, श्री संतोष उगले, श्री अनंत तायडे
नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी – मुख्याध्यापक डॉ. शिवचरण उज्जैनकर, शिक्षक श्री संतोष ठाकूर, श्री संतोष पाचपोळ, श्री रोहन आठवले, शिक्षकेतर श्री रघुनाथ इंगळे, श्री विनायक इंगळे
विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि सर्पमित्र वनिता ताई व डी. भास्करराव यांना प्रश्न विचारून अभ्यासपूर्ण उत्तरे घेतली.
प्रत्येक विद्यालयामध्ये वनिता ताई, डी. भास्करराव आणि डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचा शाल व गुलाब बुके देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षक व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.

0 9 5 5 4 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *