बुलढाणा प्रतिनिधी :
जबरदस्ती शेतात ट्रॅक्टर घूसवून महिलेस मारहाण करणाऱ्यां चार आरोपींना प्रत्येकी ६ महिन्याची शिक्षा व १ हजार रूपये दंड, अशी शिक्षा मुख्य न्यायदंडाधिकारी बुलढाणा ए. ए. खंडाळे यांनी सुनावली.
बुलढाणा शहराजवळील येळगाव धरणा शेजारील महिला शेतकरी यांनी पोलिस स्टेशन बुलढाणा ग्रामीण येथे तक्रार दिली की, २८ एप्रिल २०२४ रोजी आरोपी मच्छिद्र पवार व इतर असे फिर्यादीच्या शेतात ट्रॅक्टर घेऊन शिरले व जबरदस्ती नांगरणी करण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादी महिलेने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्व आरोपींनी फिर्यादी महिला इळा व लाथाबुक्क्यांनी
मारून जखमी केले व जीवाने मारण्याची धमकी दिली. परंतु त्याठिकाणी कोथिंबीर विकत घेण्यास आलेले भाजीपाला व्यापारी यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले. याप्रकरणी स्वतः फिर्यादी व प्रत्यक्ष घटना पाहून भांडण सोडवणारे भाजीपाला व्यापारी यांच्या साक्ष पुराव्या आधारे मुख्य न्यायदंडाधिकारी बुलढाणा अमित खंडाळे यांनी सर्व चारही आरोपींना कलम ३२४ भादंविनुसार ६ महिने शिक्षा व प्रत्येकी २ हजार दंड तथा कलम ३२३ भादंवि नुसार प्रत्येकी १ महिना शिक्षा व रुपये १ हजार दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील हितेश रहाटे यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. तर पैरवी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल विलास बंगाळे यांनी सहकार्य केले.
शेतकरी महिलेस मारहाण; चार आरोपींना प्रत्येकी सहा महिन्यांची शिक्षा
0
9
7
3
9
8
Users Today : 17
Leave a comment