चिखली प्रतिनिधी :
चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात काँग्रेसने त्यांना अभिवादन केले.
कार्यक्रमात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अजितदादा पवार हे मनमिळाऊ, समाजाभिमुख आणि सर्वसामान्यांशी घट्ट नाळ जोडून काम करणारे व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि लोकांशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध कायम स्मरणात राहील, असे ते म्हणाले.
यावेळी उपस्थित होते:
चिखली शहर काँग्रेसचे प्रभारी संघटक: अतहरोद्यीन काझी
ज्येष्ठ नेते: आत्माराम देशमाने, वर्धनमान डहाळे
युवक काँग्रेस: शहराध्यक्ष शेख जाकीर, प्रदिप पचेरवाल, मिलींद पालवे, संतोष देशमुख, आनंद बोंद्रे, गोकुळ शिंगणे, प्रशात भटकर, राहुल चवरे, डॉ. रविंद्र कमळस्कर, अशोकराव पडघान, अंजू ठेंग, प्रमोद पाटील, समाधान भटकर, याया खान, मलीक जमदार, भिका ठेंग, दीपक थोरात, प्रकाश सपकाळ, विजू निकाळजे, शेख इरफान, शहेबाज खान, संजय गिरी
तसेच चिखली काँग्रेस कमिटीचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसकडून दिलेल्या या भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाने स्व. अजितदादा पवारांच्या स्मृतीला उजाळा दिला.
Users Today : 17