नंदाई कन्यारत्न पुरस्कार’ निकिता बोहरपी यांना बहाल

KHOZ MASTER
1 Min Read

खामगाव प्रतिनिधी :

आझाद नारी फाउंडेशनच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मंगलदिनी चौथा नंदाई कन्यारत्न पुरस्कार-२०२६ निकिता संतोष बोहरपी यांना बहाल करण्यात आला. निकिता इयत्ता ७ वीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या असून, गेल्या तीन वर्षांची परंपरा जपत, दरवर्षी प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनीचा गौरव करण्याचा हा उपक्रम राबवला जात आहे.
या प्रसंगी संस्थेचे संचालक राहुल सुरवाडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे आहे. अशा सन्मानामुळे विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा व प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांमधील गुणवैशिष्ट्ये, अभ्यासातील सातत्य आणि मिळवलेले यश हे केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरते. स्त्रीशक्तीचा आणि गुणवत्तेचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो.
विद्यार्थ्यांच्या आयुष्यात हा पुरस्कार महत्त्वाचा मैलाचा दगड ठरावा, यासाठी संस्था शैक्षणिक साहित्य व शालेय आर्थिक मदतही करते, असेही राहुल सुरवाडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाला केंद्रप्रमुख हरिदास पाटेखेडे, सरपंच, संस्थेच्या आधारस्तंभ नंदाबाई सुरवाडे, साहेबराव सुरवाडे, शाळेचे मुख्याध्यापक दिनेशकुमार चोपडे, सचिन कानपुरे, एस.डी. बुंदीले, मारोती नाईक, प्रदीप बघे, दादु उमाळे, शिवा ठाकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, आजी-माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 7 3 9 8
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *