लाडसावंगी येथे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचार सभा

KHOZ MASTER
1 Min Read

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी :

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष या आघाडीतील सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आज लाडसावंगी येथे भव्य प्रचार सभा पार पडली.
सभा दरम्यान उमेदवारांना विजयी करून जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.
यावेळी जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष श्री. विलास बापू औताडे, जिल्हाध्यक्ष श्री. किरण डोनगावकर, जिल्हा बँकेचे संचालक श्री. जगन्नाथ काळे, महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते श्री. भाऊसाहेब जगताप, युवक जिल्हाध्यक्ष श्री. विश्वास औताडे, श्री. अशोक डोळस यांसह आघाडीतील सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत उमेदवारांचा प्रचार व मतदारांना जागरूक करण्याचे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

0 9 7 3 9 8
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *