ममता सिंधुताई सपकाळ साधणार बुलढाणेकरांशी जिव्हाळ्याचा संवाद ‘तू आहेस ना…’ कार्यक्रमातून अनुभव, आठवणी आणि गझल सादरीकरण

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :
‘तू आहेस ना…’ या जिव्हाळा परिवाराच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात ममता सिंधुताई सपकाळ या बुलढाणेकर रसिकांशी जिव्हाळ्याचा संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमातून त्या पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याचा वारसा, मायलेकीचे भावबंध, तसेच मानवतेच्या सेवेतून मिळालेले अनुभव यांवर मनमोकळेपणाने भाष्य करणार आहेत.
मानवसेवेचा आईचा वारसा जपत असताना आलेले अनुभव, भावनिक आठवणी आणि समृद्ध गझल सादरीकरणातून ममता सिंधुताई यावेळी रसिकांसमोर व्यक्त होणार आहेत. शनिवार, ३१ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शहरातील गोवर्धन हॉल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात कीर्ती वैराळकर या ममता सिंधुताई यांच्याशी संवाद साधणार असून, कोमल सुकेश झंवर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन जिव्हाळा परिवाराच्या वतीने करण्यात आले असून,
डॉ. माधवी जवरे, प्रा. शाहिना पठाण, प्रज्ञा लांजेवार, डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे, अॅड. शर्वरी तुपकर, मालती शेळके, प्रा. डॉ. संगीता पवार, प्रा. स्वाती कस्तुरे, अर्चना जाधव, वैशाली राजपूत, अनिता खडके, प्रा. सीमा काळणे, डॉ. साधना भवटे, वैशाली तायडे यांनी परिश्रम घेतले आहेत.
बुलढाणेकर रसिकांनी या भावस्पर्शी आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

0 9 5 5 4 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *