मानोरा तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

KHOZ MASTER
2 Min Read

मानोरा प्रतिनिधी :
मानोरा येथील तहसील कार्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तहसीलदार राजेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक नैना पोहेकर, नायब तहसीलदार उमेश बनसोड, मधुकर अस्टुले, देवेन्द्र मुकुंद, गटविकास अधिकारी विलास जाधव, तालुका कृषी अधिकारी रोशन भागवत, कृषी मंडळ अधिकारी उमेश राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर मानोरा तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
ग्लोबल इंग्लिश प्रायमरी स्कूल, मानोरा येथील विद्यार्थ्यांनी ‘जय हो’ व ‘सुनो गौर से दुनिया’ या गीतांवर स्फूर्तीदायक नृत्य सादर केले.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शिवाजीनगर यांच्या विद्यार्थ्यांनी ‘मल्लारी भंडार’ या गीतावर कला सादर केली.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा (गट वर्ग ६ ते ८) येथील विद्यार्थ्यांनी ‘अंबे कृपा करी’ या रचनेवर मनमोहक सादरीकरण केले.
कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर अ‍ॅण्ड इंग्लिश प्रायमरी स्कूल, मानोरा येथील विद्यार्थ्यांनी ‘बंजारा रिमिक्स’ सादर करून लोकसंस्कृतीचे सुंदर दर्शन घडवले.
वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथील विद्यार्थ्यांनी ‘ओल्ड एज होम (वृद्धाश्रम)’ या विषयावर आधारित अत्यंत हृदयस्पर्शी सादरीकरण केले.
तर शिक्षा इंग्लिश मीडियम स्कूल, मानोरा येथील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर सादरीकरण करून उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागवली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसील कार्यालयातील कर्मचारी, शिक्षकवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या दर्जेदार कलाविष्कारांचे उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केले

0 9 7 3 9 8
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *