सुलतानपूर : भारतीय जनता पार्टीशी संलग्न असलेल्या सेवाशक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या मेहकर आगाराची नवनिर्वाचित कार्यकारिणी दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी खेळीमेळीच्या वातावरणात सर्वानुमते बिनविरोध निवडण्यात आली. ही निवड संघटनेचे राज्याध्यक्ष मा. आ. गोपीचंद पडळकर, मुख्य कार्याध्यक्ष मा. आ. सदाभाऊ खोत व सरचिटणीस मा. सतीश मेटकरी यांच्या आदेशानुसार व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
मेहकर आगाराच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीत आगार अध्यक्षपदी तेजराव तेजनकर, कार्याध्यक्ष सुवर्णसिंग जाट, सचिव गजानन धोटे, सहसचिव गणेश मोसंबे, कोषाध्यक्ष नारायण साबळे, प्रसिद्धीप्रमुख गजानन उबाळे, उपाध्यक्ष भगवान कांबळे व प्रतापराव राजगुरू, महिला प्रतिनिधी शिल्पा धोटे तसेच कर्मचारी प्रतिनिधी अंगतराव चव्हाण यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीसाठी वरिष्ठ पदाधिकारी म्हणून राज्य सरचिटणीस सुनील पाटील, बुलढाणा विभागाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आनंदे, सतीश पाटील तेजनकर, सचिन लोखंडे, दत्ताभाऊ ढवळे, छगनराव मुळे, गणेश जाधव, रामेश्वर ठाकरे, रवी खेडकर, पुरुषोत्तम टिकार, अंकुश पाटील शिंदे, संतोष सोनुने, जी.एम. वाघमारे, राजू तळेकर, शंकर राठोड यांच्यासह बुलढाणा विभागातील सर्व आगारांचे पदाधिकारी व मेहकर आगारातील मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज्य सरचिटणीस सुनील पाटील व ज्येष्ठ नेते शिवाजी आनंदे यांनी कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, आणि अडचण आल्यास संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही दिली. तसेच सतीश पाटील तेजनकर व छगनराव मुळे यांनीही खांद्याला खांदा लावून सहकार्य करण्याची हमी दिली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी मेहकर आगारात संघटनेचे सभासद वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा संकल्प व्यक्त केला. यानंतर नवनिर्वाचित कार्यकारिणीने मेहकर आगाराचे आगार व्यवस्थापक हर्षल साबळे यांची भेट घेऊन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आगार व्यवस्थापकांनी कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे स्पष्ट मत व्यक्त केले.
Users Today : 17