बुलढाणा : नांद्रकोळीच्या पाच तरुणांचा देशसेवेत निवड होणे – प्रेरणादायी यश

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी : तालुक्यातील नांद्रकोळी गावातून पाच तरुणांचा भारतीय सुरक्षा दलांमध्ये निवड होणे ही अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बाब ठरली आहे.
यश मिळवणाऱ्या तरुणांमध्ये आहेत:
प्रविण संजय चौधरी (CISF)
गणेश राजू शिंदे (CISF)
आकाश प्रकाश राऊत (BSF)
सचिन गणेशराव राऊत (CISF)
दिलीप अर्जुन उबाळे (CISF)
ही पाचही तरुण शेतकरी कुटुंबातून असून, आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. आजच्या काळात बेरोजगारी, स्पर्धा आणि सामाजिक तणावामुळे तरुण निराशेकडे वळतात; मात्र नांद्रकोळीच्या या पाच तरुणांनी ध्येयवादी राहून देशसेवेची वाट निवडली आणि समाजासाठी आशेचा किरण उभा केला आहे.
यापूर्वी विष्णू पुंडलिक उबाळे या गावच्या तरुणाने CRPF मध्ये मिझोराम येथे दोन वर्षांपासून कार्यरत राहून गावासाठी अभिमानाचे प्रतीक निर्माण केले आहे.
या यशस्वी तरुणांचा सत्कार शिवसेना (उबाठा) पक्षाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. जयश्रीताई शेळके यांनी म्हणाले,
“ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील तरुणांनी देशसेवेच्या माध्यमातून मिळवलेले हे यश संपूर्ण समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”

0 9 5 5 4 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *