पाच वर्षांच्या चिमुरडीवर नराधमाचा अत्याचार परप्रांतीय मजुराला मलकापूर रेल्वे स्थानकावर अटक

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा, दि. १ (प्रतिनिधी)
बुलढाणा तालुक्यातील हतेडी शिवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामस्थळी एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर २५ वर्षीय परप्रांतीय मजुराने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी आरोपीला मलकापूर रेल्वे स्थानकावरून अटक केली असून घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हतेडी शिवारात ‘सॅम इंडिया’ या कंपनीमार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी झारखंड राज्यातील संतोष ब्रिजपाल भोईया (वय २५) हा मजूर कामाला होता. २८ जानेवारी रोजी दुपारी चिमुरडी एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिला झोपडीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर पीडित मुलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला.

घटना उघडकीस येऊ नये म्हणून आरोपीने पीडित मुलीला उपचारासाठी न नेता तिचे अपहरण केले आणि तिला घेऊन मलकापूर रेल्वे स्थानक गाठले. मात्र बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने शिताफीने कारवाई करत आरोपीला तेथून ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे कोणतेही वैध ओळखपत्र, अगदी आधार कार्डही नसल्याचे तपासात समोर आले आहे. बांधकामस्थळी काम करणाऱ्या मजुरांची नोंदणी व पडताळणी करणे कायद्याने बंधनकारक असताना कोणतीही कागदपत्रे नसलेल्या परप्रांतीय मजुराला कामावर ठेवण्यात आल्याने संबंधित ठेकेदार व कंपनीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी आरोपी संतोष भोईया याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यासह अपहरणाचे गुन्हे दाखल केले आहेत. आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

पीडितेची प्रकृती चिंताजनक

अत्याचारामुळे पीडित मुलीचा रक्तस्त्राव थांबत नसल्याने तिला तातडीने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले असून तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे.

0 9 5 5 4 8
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *