गुरु रविदास जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन मोटारसायकल रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद; आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते मूर्ती पूजन

Khozmaster
3 Min Read

बुलढाणा, दि. ३ (प्रतिनिधी):
समतेचे पुजारी संत मीराबाई यांचे गुरु संत रविदास महाराज यांची जयंती चर्मकार समाजाच्या वतीने बुलढाणा येथे विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता धाड नाकास्थित गुरु रविदास मंदिरात करण्यात आली. यावेळी दादासाहेब काटकर यांच्या हस्ते मुख्य पूजा पार पडली. तसेच सर्व उपस्थित बंधू-भगिनींकडून भीमसेन शिराळे यांनी गुरु रविदासांचे दोहे पठण करून घेतले.

यानंतर शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. पुढे संगम चौक येथे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते स्मारकावरील गुरु रविदास महाराजांच्या मूर्तीचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर भव्य शोभायात्राही काढण्यात आली.

गुरु रोहिदास भवन येथे मुख्य सभा

गुरु रोहिदास भवन येथे आत्माराम चांदोरे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड, नगरसेवक अशोक इंगळे, नगरसेविका देविकाताई परसे तसेच चिखली नगर परिषदेचे आरोग्य सभापती विष्णू जोगदंड यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात प्रा. डी. आर. माळी यांनी आयोजनामागची भूमिका स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. सभेत नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड, अशोक इंगळे, देविकाताई परसे, दामोदर बिडवे, लक्ष्मण घुमरे, दादासाहेब काटकर, कुणाल पैठणकर आदींनी मनोगत व्यक्त केले.

विचार मंचावर अॅड. राजेश अशोकराव पसरटे, मानसिंग पूरभे, डॉ. सुनिता खरडे, मायाताई पद्मने, आशिष जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गणेश खनसरे यांनी तर आभार प्रदर्शन भागवतराव तांदळे यांनी केले.

गांधी भवन येथे शाहीर मेघानंद जाधव यांचा गीतगायन कार्यक्रम

सायंकाळी गांधी भवन येथे दादासाहेब काटकर यांच्या अध्यक्षतेखाली शाहीर मेघानंद जाधव यांचा भव्य गीतगायन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय गायकवाड यांनी केले. यावेळी बहुजन समाजातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी शाहिरांनी गुरु रविदास महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाई आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित दमदार गीते सादर केली.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांबळे, यंत्र अभियंता संतोषराव वानेरे, डॉ. राजेश्वर उबरहंडे, कुणाल पैठणकर, भागवतराव तांदळे, उत्सव समितीचे कार्याध्यक्ष उमेश सुरेशराव कावळे, विमलताई भीमसेन शिराळे, कमलताई अनिल पसरटे, डॉ. वर्षाताई मोरे, प्रा. आर. एस. बशिरे, बी. एस. खरात, तेजराव पूर्वे, विलास पसरटे, गोपाल काकडे आदी उपस्थित होते.

चर्मकार समाजाचे बंधू-भगिनी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत जयंती उत्साहात साजरी केली.

0 9 2 6 4 1
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *