अकोला, दि. ५ (प्रतिनिधी):
महाराष्ट्र स्पोर्ट्स काऊन्सिल ऑफ द डिफ असोसिएशनतर्फे नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय मूकबधीर दिव्यांग बुद्धिबळ स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत आपला दबदबा निर्माण केला.
या स्पर्धेत अकोल्याच्या संघातील खेळाडू सलमान मोहम्मद याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच सोहेल शहा याने तृतीय क्रमांक मिळवून अकोल्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
या दोन्ही खेळाडूंना असोसिएशनचे प्रशिक्षक अश्विन कट्टा यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र स्पोर्ट्स काऊन्सिलचे अध्यक्ष राजेश नायर, सचिव गोपाल बिबरे, चेतन जोशी तसेच दुभाषीक वरद कुळकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या यशाबद्दल अकोला असोसिएशनच्या वतीने सलमान मोहम्मद व सोहेल शहा यांचे पंकज जायले, अभय मुळे, मधुर खंडेलवाल यांनी अभिनंदन करून स्वागत केले.
राज्यस्तरीय मूकबधीर दिव्यांग बुद्धिबळ स्पर्धेत अकोल्याचा डंका
0
9
7
4
0
1
Users Today : 20
Leave a comment