जिजाऊ ज्ञान मंदिरात माता रमाई जयंती उत्साहात साजरी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले मनोगत, शिक्षकांचे गीत सादरीकरण

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा :
राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट, सुंदरखेड (बुलढाणा) द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल व ज्युनिअर कॉलेज, पळसखेड भट (रायपूर) येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट होते. यावेळी शाळेतील शिक्षकवृंद प्रमुख उपस्थित होते. सर्वप्रथम माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी माता रमाई यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेच्या सहाय्यक शिक्षिका प्रियंका सरकटेरूपाली सुसर यांनी बहारदार गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

याप्रसंगी बोलताना प्राचार्य किशोर सिरसाट यांनी माता रमाई यांच्या त्यागाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले की, माता रमाई यांनी अत्यंत कष्ट व हाल सहन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्येक टप्प्यावर आधार दिला. बाबासाहेबांच्या प्रत्येक कार्यात त्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या.

त्यांनी माता रमाई यांच्या आयुष्यातील एक हृदयद्रावक प्रसंग सांगताना म्हटले की, मुलगा आजारी असतानाही बाबासाहेबांना आर्थिक अडचण भासत असल्यामुळे रमाबाईंनी मुलाच्या औषधासाठीचे पैसे बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी दिले. परिणामी मुलगा दगावला. इतका मोठा त्याग माता रमाई यांनी बाबासाहेबांसाठी, आणि पर्यायाने देशासाठी केला. त्यामुळेच बाबासाहेब देशाला दिशा देणारी घटना लिहू शकले.

अशा त्यागमूर्ती माऊलींचे चरित्र वाचून बाबासाहेबांचे विचार आत्मसात करणे हीच खरी आदरांजली आहे,” असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन रूपाली गवते यांनी केले.

0 9 4 0 5 5
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *