बुलढाणा, दि. ९ (प्रतिनिधी) :
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा यांच्या अंतर्गत माजी सैनिक, माजी सैनिक विधवा तसेच त्यांच्या अवलंबितांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १२ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर शिबिर पोलीस ग्राउंड समोरील प्रभा हॉल, बुलढाणा येथे १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
या शिबिरामध्ये माजी सैनिक, माजी सैनिक विधवा तसेच त्यांच्या अवलंबितांना विविध कायदेशीर बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात येणार असून, त्यांच्या अडचणी व प्रश्नांबाबत तज्ज्ञांकडून माहिती देण्यात येणार आहे.
तरी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व अवलंबितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे.
Users Today : 16