राजेशने केल्या २१ घरफोड्या, राजेंद्रच्या नावावर १७ गुन्हे ! टीम ‘एलसीबी’ने पकडले तीन अट्टल चोरटे

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा, दि. १३ (प्रतिनिधी)

चोरी, घरफोड्या व दरोड्याच्या गुन्ह्यांत फरार असलेल्या आरोपींचा शोध सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने तीन अट्टल चोरट्यांना अटक करून मोठी कारवाई केली आहे. चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेशने तब्बल २१ घरफोड्या, तर राजेंद्रने १७ घरफोडी व चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. जालना जिल्ह्यातील परतूर व मंठा परिसरातून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राजेंद्र बाबासाहेब राऊत (वय २५, रा. सेलूरोड, परतूर, जि. जालना), राजेश शंकर शर्मा (वय ३०, रा. आनंदवाडी, मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक) आणि श्रीराम सोमनाथ सोनवणे (वय २०, रा. जातेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी आहेत.

पोलिस तपासात समोर आले की, आरोपी राजेंद्र राऊत याच्यावर घरफोडी व चैन स्नॅचिंगचे १७ गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी राजेश शर्मा याच्यावर घरफोडीचे २१, दरोड्याची तयारी , चोरी , जबरी चोरी असे एकूण २७ गुन्हे नोंद आहेत. तसेच आरोपी श्रीराम सोनवणे याने दुचाकी चोरीचे ८ गुन्हे केल्याची माहिती आहे.

💰 ६ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त

या आरोपींकडून सोन्याचे ब्रासलेट, कानातील टॉप्स, मोबाईल आणि कार असा एकूण ६ लाख ८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

🏛️ आरोपींना पीसीआर

अट्टल गुन्हेगार असलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींना पोलीस कोठडी (पीसीआर) देण्यात आली आहे.

👮‍♂️ एलसीबी पथकाची कौतुकास्पद कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिकअमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच एलसीबीचे प्रमुख सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पीएसआय अविनाश जायभाये, पोहेकॉ दीपक लेकुरवाळे, शेख चाँद, गणेश पाटील, पोलीस शिपाई गजानन गोरले, निवृत्ती पुंड, तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोहेकॉ राजू आडवेऋषी खंडेराव यांनी विशेष परिश्रम घेतले.

🏠 शेगावातील घरफोडीचा छडा

शेगावातील माऊलीनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या धीरजकुमार रामपाल सिंग (वय ३५) यांच्या घरात ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान चोरी झाली होती. चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे ब्रासलेट, टॉप्स व कार चोरून नेली होती. या गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलीस व एलसीबी पथकाकडून समांतर सुरू होता.

0 9 3 0 7 9
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *