बुलढाणा प्रतिनिधी :
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारी राष्ट्रमाता जिजाबाई (जिजाऊ) व बाल शिवबा यांच्या भव्य शिल्पाचे आज अनावरण करण्यात येणार आहे.
पालकमंत्री मकरंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार असून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव व रक्षाताई खडसे यांच्या हस्ते शिल्पाचे अनावरण होणार आहे. यावेळी सहपालकमंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर, विधान परिषद सदस्य किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धीरज लिंगाडे तसेच विधानसभा सदस्य चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, संजय गायकवाड, श्वेताताई महाले, सिद्धार्थ खरात, मनोज कायंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, शिल्पकार प्रमोद कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारी जिजाऊंची प्रतिमा स्थापित करण्यात आली होती. आता मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या संकल्पनेतून राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबा यांच्या शिल्पाची स्थापना करण्यात आली आहे. या निमित्ताने शाहीर विक्रांतसिंग राजपूत यांचा शाहिरी जागर कार्यक्रमही आयोजित करण्यात आला असून शिवभक्तांसाठी सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे.
शिवजयंतीच्या औचित्यावर आयोजित या भव्य शिल्प अनावरण सोहळ्यास सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुशील गुडधे यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेत बालशिवबांसह जिजाऊंच्या शिल्पाचे आज अनावरण शिवजयंती निमित्त सोहळा; शाहिरी जागराची रंगत
0
9
5
5
5
1
Users Today : 9
Leave a comment