सहकारातील कार्यकर्ता गौरवाचा क्षण : राधेश्याम चांडक

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :
बुलढाणा जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या सभेमध्ये चिखली शहराचे नवनियुक्त नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्याने आपल्या कामाच्या बळावर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवून विजय मिळवणे ही बाब सहकार क्षेत्रातील संचालक व अध्यक्षांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत फेडरेशनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केले.
पंडितराव देशमुख यांनी श्रीराम नागरी पतसंस्था स्थापन करून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. तसेच जिजाऊ कॉन्व्हेंट शाळा, जुन्या गावातील स्मशानभूमी संवर्धन व सुशोभीकरण, संस्थेची सुसज्ज इमारत उभारणी यांसारख्या विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला. कोणताही राजकीय वारसा नसलेल्या सामान्य कुटुंबात जन्म असूनही गेल्या ३० ते ३५ वर्षांत त्यांनी राजकारण व समाजकारणात सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले.
तीन ते चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून येत त्यांनी भाजपा नगराध्यक्षपद भूषविले असून सध्या ते चिखली नगर परिषदेचे अध्यक्ष आहेत. याशिवाय ते बुलढाणा जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत.
या सत्कार प्रसंगी फेडरेशनचे मानद सचिव सुरेंद्र पांडे, उपाध्यक्षा स्वातीताई वाकेकर, संचालक मखनलालजी मुंदडा, दीपक देशमाने, स्वातीताई कनेर, सतीश कायंदे, गोविंद मापारी, बबनराव गिहे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पंडितराव देशमुख यांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
चिखली शहराचा सर्वांगीण विकास त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक वेगाने व्हावा, अशा सदिच्छा उपस्थितांनी व्यक्त केल्या

0 9 5 5 5 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *