कामगारांच्या सदृढ, निरोगी आरोग्यासाठी उद्या आरोग्य तपासणी शिबिर

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :
कामगारांच्या सदृढ व निरोगी आरोग्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र शासनातर्फे कामगार कल्याण केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने २० फेब्रुवारी २०२६ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे निशुल्क शिबिर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, विभागीय कार्यशाळा, बुलढाणा येथील कामगार कर्मचाऱ्यांसाठी दुपारी १२.३० ते ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथील तज्ञ वैद्यकीय चिकित्सकांमार्फत केली जाणार आहे.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या शिबिराला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाठ, यंत्र अभियंता नितीन जयस्वाल, दिगंबर जाधव, विनोद इलामे, कामगार अधिकारी राहुल तांबडे, चंद्रशेखर केणे, जयंत कोडलकर, अनिल बहिरम, अजय नाईक आदी मान्यवर उपस्थित राहतील.
विशेष मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. अविनाश गेडाम, प्रा. अर्जुन बोकाडे, प्रमोद टाले यांची उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय डॉ. चैतन्य जाधव, डॉ. प्रज्ज्वल आंबेकर, डॉ. वसीम चौधरी, डॉ. एम. कदम, डॉ. साई कृष्णा, समाधान खुरदे, योगेश एकडे, खलील मा. पठाण आदी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत.
कामगारांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार कल्याण केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने विद्या किशोर शिंदे व नीलेश प्र. देशमुख यांनी केले आहे.

0 9 5 5 5 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *