बुलढाणा प्रतिनिधी :
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान तसेच कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) विशेष सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात कुष्ठरोग तपासणी व व्यापक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.
शिबिरात उपस्थित नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून संभाव्य लक्षणांची छाननी करण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरभेटी देत नागरिकांना कुष्ठरोगाबाबत सविस्तर माहिती दिली.
कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणे
त्वचेवर फिक्कट पांढरे किंवा लालसर-तांबूस रंगाचे बधिर चट्टे
तेलकट व गुळगुळीत त्वचा
भुवयांचे केस विरळ होणे
हात-पायाला मुंग्या येणे व बधिरता
बोटे वाकडी होणे
अंगावर गाठी येणे
मज्जाबाधा
कानाच्या पाळ्या जाड होणे
आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी. कुष्ठरोगावर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत आणि प्रभावी उपचार उपलब्ध असून, लवकर निदान झाल्यास पूर्ण बरे होणे शक्य आहे.
या शिबिरामुळे ग्रामीण भागात आरोग्यविषयक जागरूकता वाढण्यास मदत होत असून, कुष्ठमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले जात आ
Users Today : 9