बुलढाणा प्रतिनिधी :
गंभीर व दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्णांना दिलासा देण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात पॅलिअटिव्ह केअर सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. असाध्य व जीवघेण्या आजारांमुळे त्रस्त रुग्णांना औषधोपचारासोबतच समुपदेशन, मानसिक आधार आणि सामाजिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा या सेवेचा मुख्य उद्देश आहे.
पॅलिअटिव्ह केअर अंतर्गत कर्करोग, किडनी किंवा यकृत निकामी होणे, अर्धांगवायू, दीर्घकालीन श्वसन विकार तसेच इतर असाध्य आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेदना नियंत्रण, लक्षणांवर उपचार, मानसिक मार्गदर्शन आणि कुटुंबीयांना समुपदेशन करण्यात येणार आहे.
ही सेवा बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे.
घरपोच सेवा उपलब्ध
गंभीर रुग्णांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रुग्णांच्या घरी भेट देऊनही सेवा पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी अधिकाधिक रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक दत्तात्रय बिराजदार यांनीही या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करत जिल्हा रुग्णालय व अधिनस्त आरोग्य संस्थांमार्फत गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण केल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील पात्र रुग्णांनी पॅलिअटिव्ह केअर सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात पॅलिअटिव्ह केअर सेवेचा प्रारंभ गंभीर व दीर्घकालीन आजारग्रस्त रुग्णांना दिलासा
0
9
5
5
5
1
Users Today : 9
Leave a comment