शिवजयंतीनिमित्त १५ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना विस्तार अधिकारीपदी बढती

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी जिल्ह्यातील पंधरा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना विस्तार अधिकारीपदी पदोन्नती देत अनोखी भेट दिली. या निर्णयामुळे संबंधित अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
उत्कृष्ट कामकाज व प्रशासकीय कार्यक्षमता लक्षात घेऊन ही पदोन्नती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवजयंतीच्या औचित्यावर घेतलेल्या या निर्णयाचे कर्मचारीवर्गातून स्वागत करण्यात आले असून, हे कार्यक्षम अधिकाऱ्यांसाठी प्रोत्साहन असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये पंजाब मोरे, सुरेश मवाळ, ज्ञानेश्वर चनखोरे, गजानन कावरखे, विष्णू गीते, बी. डी. मांटे, संजय खरात, संजय हाके, संजय गिडे, रवींद्र बोबडे, कैलास चौधरी, एन. एम. झाल्टे, सुभाष काळे आणि रवींद्र सावरकर यांचा समावेश आहे.
या पदोन्नतीविषयी जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. निर्णयाबद्दल ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस देवेंद्र बरडे यांनी समाधान व्यक्त केले.
तसेच या निर्णयाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) आशिष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) शिवशंकर भारसाकळे, समाज कल्याण अधिकारी प्रमोद एंडोले आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड यांचे संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले

0 9 5 5 5 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *