बोलेरोची धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :
मलकापूर येथील बुलढाणा रोडवरील दाताळानजीक वृद्धाश्रमाजवळ भरधाव वेगातील बोलेरो वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यान घडली.
शेलापूर येथील सुरेश भोपळे (वय ४५) हे मलकापूरहून एमएच-२८-डब्ल्यू-३४६१ क्रमांकाच्या दुचाकीने शेलापूरकडे जात होते. दरम्यान, दाताळा परिसरातील वृद्धाश्रमानजीक मलकापूरकडे भरधाव वेगात येणाऱ्या एमएच-२८-एच-९०७६ क्रमांकाच्या बोलेरो वाहनाच्या चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात सुरेश भोपळे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पत्रकार विलास खर्चे, सुहास नारखेडे, राहुल पाटील व सोहम पाटील यांनी तत्काळ मदत करत त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर व अॅड. हरीश रावळ यांनी रुग्णालयात जाऊन जखमीची विचारपूस केली. पुढील तपास सुरू आहे

0 9 5 5 5 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *