बुलढाणा प्रतिनिधी :
विदर्भ युवक विकास संस्थेद्वारा संचालित मुकुल वासनिक विधी महाविद्यालयात १९ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी वि.यु.वि. संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. संतोष आंबेकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. संस्थेच्या सचिव प्रा. मिनल आंबेकर, प्र. प्राचार्या शिल्पा ठाकरे, प्रा. प्रिया पाटील, प्रा. निती जयवार, प्रा. ज्योत्स्रा आराख यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संतोष आंबेकर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेत स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी केलेल्या महान कार्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच संस्थेच्या सचिव प्रा. मिनल आंबेकर यांनी शिवरायांनी दिलेल्या स्वराज्य, स्वदेश आणि स्वधर्माच्या शिकवणीवर विचार मांडले.
कार्यक्रमाचे संचालन एलएलबी ३ वर्षीय अभ्यासक्रम भाग-१ चे विद्यार्थी संदिप सावळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन भिमराव खंडारे यांनी मानले. यावेळी प्रचिण नवघरे, शिवचरण टिकार, अमोल लहाने, विजवसिंग हाडे तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘जय शिवराय’च्या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.
मुकुल वासनिक विधी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात
0
9
5
5
5
1
Users Today : 9
Leave a comment