बुलढाणा प्रतिनिधी :
उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने २४ व २५ फेब्रुवारी रोजी बुलढाणा येथील गर्दे वाचनालय येथे ग्रंथोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.
या ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री, परिसंवाद, व्याख्याने, कवी संमेलन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रंथालय कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. अतुल वानखेडे व मातृतीर्थ जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक रफिक कुरेशी यांनी केले आहे.
२४ फेब्रुवारी कार्यक्रम
सकाळी १० वाजता ग्रंथ पूजन
हुतात्मा स्मारक, बुलढाणा ते गर्दे वाचनालय दरम्यान ग्रंथ दिंडी
दुपारी १२ वाजता उद्घाटन सोहळा
उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री Prataprao Jadhav यांच्या हस्ते होणार असून, केंद्रीय राज्यमंत्री Raksha Khadse, पालकमंत्री मकरंद जाधव, सहपालकमंत्री संजय सावकारे, अकोला पालकमंत्री आकाश फुंडकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
यावेळी विविध आमदार, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या वेळेत “मराठी भाषेची पुढील आव्हाने” या विषयावर परिसंवाद होणार आहे.
२५ फेब्रुवारी कार्यक्रम
सकाळी ११ ते १ – “वाचन संस्कृती: काल, आज आणि उद्या” या विषयावर मार्गदर्शन
दुपारी २ ते ४ – कवी संमेलन
सायंकाळी ४ ते ५ – प्रा. डॉ. सदानंद देशमुख यांच्या उपस्थितीत समारोप
ग्रंथोत्सवामुळे शहरात वाचनसंस्कृतीला चालना मिळणार असून पुस्तकप्रेमींसाठी हा दोन दिवसीय उत्सव पर्वणी ठरणार आहे.
बुलढाणा येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी ग्रंथोत्सव २०२५
0
9
3
3
2
1
Users Today : 10
Leave a comment