हतेडी बु येथे उबाठा गटाच्या संगीता जाधव यांच्यासह महिलांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :

बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील हतेडी बु येथे आज राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण घडामोड घडली. उबाठा गटाच्या संगीता प्रकाश जाधव यांच्यासह असंख्य महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांनी शिवसेना मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. हा सोहळा माझ्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
ग्राम परिसरातील विविध महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेची ध्येयधोरणे स्वीकारली. या पक्षप्रवेशामुळे हतेडी परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक जिजाबाई राठोड, ज्येष्ठ शिवसैनिक संदीप जाधव, विठ्ठल सावकार, वामनराव जाधव, विलास जाधव, विदुर जाधव, स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे, संभाजी निकाळजे, सुनील झिने, दामोदर पाटील यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, माता-भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत करत सांगण्यात आले की, “शिवसेना ही सामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे संघटनेला नवे बळ मिळेल.”

0 9 5 5 5 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *