मोताळा तालुक्यात विकासाची नवी दिशा; १ कोटी २४ लाखांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :

विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुका येथे आज १ कोटी २४ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण माझ्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ठोस पावले उचलण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रमुख कामे :
दाभा येथे ‘धर्मवीर नगर’ नामफलकाचे अनावरण
खामखेड येथे २० लाखांच्या मातोश्री ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण
गुळभेली–दाभा रस्ता सुधारणा (२५ लाख रुपये)
मौजे नळकुंड येथे ७९ लाखांच्या नाला खोलीकरण कामाचा शुभारंभ
या कामांमुळे ग्रामस्थांना मूलभूत सुविधा उपलब्ध होणार असून वाहतूक, पाणी व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासन अधिक सक्षम होणार आहे. प्रत्येक गावात पायाभूत सुविधा पोहोचविण्याचा निर्धार यावेळी पुन्हा व्यक्त करण्यात आला.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

0 9 5 5 5 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *