बुलढाणा येथील विद्यार्थिनीचा राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांक

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :

बुलढाणा येथील St. Joseph English High School Buldhana मधील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु. रिदा अबरार खान (वय १४ वर्षे) हिने महाराष्ट्र राज्यस्तरीय विज्ञान मॉडेल मेकिंग स्पर्धा २०२६ मध्ये प्रथम क्रमांक पटकावत शाळेचा व जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.
ही स्पर्धा २० फेब्रुवारी २०२६ रोजी Shivaji Science College Chikhli येथे पार पडली. राज्यभरातून ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, तर २०० पेक्षा जास्त विज्ञान मॉडेल्स सादर करण्यात आली होती.
कु. रिदाने “एआय स्मार्ट मिरर असिस्टंट” हा नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करून परीक्षकांची मने जिंकली. दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारे हे मॉडेल व्यवहार्य व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्याचे परीक्षकांनी नमूद केले. या स्मार्ट आरशाद्वारे वेळ, हवामान, दिनदर्शिका, सूचना तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मार्गदर्शन मिळू शकते, अशी माहिती सादरीकरणादरम्यान देण्यात आली.
प्रेक्षक व मान्यवरांकडूनही या प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात आले. स्पर्धेत कठीण स्पर्धकांचा सामना करत रिदाने प्रथम क्रमांक मिळवला, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली आहे.
रिदाच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळा प्रशासन, शिक्षकवर्ग, पालक तसेच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यातही ती अशाच प्रकारे विज्ञान क्षेत्रात मोठी कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

0 9 5 5 5 4
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *