Droupadi Murmu यांचे आवाहन : औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा; राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ

KHOZ MASTER
2 Min Read

 | शेगाव, दि. २५ :
आयुर्वेद व योगशास्त्र ही भारतीय ज्ञानपरंपरा जगाला स्वस्थ भविष्याची दिशा देणारी आहे. या पद्धतींचा अवलंब व प्रसार होत असतानाच औषधी वनस्पतींचे संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे. हा उपक्रम केवळ शासन-प्रशासनापुरता मर्यादित न राहता लोकचळवळ व्हावा, असे प्रतिपादन राष्ट्रपती Droupadi Murmu यांनी आज येथे केले.
केंद्र शासनाच्या Ministry of AYUSH व Akhil Bharatiya Ayurveda Mahasammelan यांच्या संयुक्त विद्यमाने विसावा भक्तनिवास संकुल परिसरात आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल Acharya Devvrat, केंद्रीय आयुष राज्यमंत्री Prataprao Jadhav, युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री Raksha Khadse, राज्याचे कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर, मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री मकरंद जाधव पाटील, आमदार संजय कुटे, आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य Rajesh Kotecha, महासंमेलनाचे अध्यक्ष प्रा. राकेश शर्मा, तसेच ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. देवेंद्र त्रिगुणा उपस्थित होते.
‘आरोग्यं परमं सुखम्’ — राष्ट्रपती
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, मन व शरीर यांचे संतुलन साधून आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा मंत्र योग व आयुर्वेदातून मिळतो. ‘आरोग्यं परमं सुखम्’ ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. देश सशक्त बनवायचा असेल तर नागरिकांचे आरोग्य उत्तम असणे अत्यावश्यक आहे. योग, आयुर्वेद, युनानी आदी आयुष पद्धती त्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
आयुष मंत्रालयामार्फत अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांची स्थापना, आयुष औषधालये, औषध परीक्षण प्रयोगशाळा आणि वैश्विक पारंपरिक चिकित्सा केंद्रांचे पुनरुज्जीवन अशी पावले उचलली जात आहेत. यासोबतच औषधी वनस्पतींचे संवर्धन व क्षेत्रविस्तार आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
आयुर्वेदाचा प्रसार अधिक व्यापक व्हावा — देवव्रत
राज्यपाल Acharya Devvrat म्हणाले, भारतीय आहारपद्धतीत पारंपरिक औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींचा वापर होत असे. मात्र आधुनिक जीवनशैलीमुळे अनावश्यक पदार्थांच्या सेवनामुळे आजार वाढताना दिसतात. त्यामुळे आयुर्वेद व आयुष पद्धतींचा प्रसार अधिक व्यापक व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

0 9 4 6 3 6
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *