बुलढाणा, दि. २५ (प्रतिनिधी)
कीर्तनातून प्रबोधन करत स्वच्छतेचा संदेश देणारे महान कृतीशील संत Sant Gadge Maharaj यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. अनेक ठिकाणी स्वच्छता अभियान हाती घेऊन कृतीशील अभिवादन करण्यात आले.
चिखली नगर परिषदेतर्फे स्वच्छता अभियान
Chikhli Municipal Council यांच्या वतीने नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सखोल स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी सार्वजनिक ठिकाणे, मुख्य रस्ते, बाजारपेठ परिसर तसेच इतर भागांची स्वच्छता करण्यात आली. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत संत गाडगे महाराजांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन करण्यात आले.
या अभियानात नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, उपाध्यक्ष वैशाली कपिल खेडेकर, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, पाणीपुरवठा सभापती दत्ता सुसर, महिला व बालकल्याण सभापती सुषमा विलास चव्हाण, प्रिया राम बनसोडे, विष्णू जोगदंडे यांसह नगरपरिषदेतील इतर नगरसेवक सहभागी झाले होते.
धाड येथे विद्यालयात जयंती उत्साहात
धाड येथील Dnyandeorao Bapu Dandge Vidyalaya येथे संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ‘स्वच्छता हीच खरी ईश्वर सेवा’ हा मूलमंत्र विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून पटवून देण्यासाठी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
मुख्याध्यापक डवले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालय परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. संस्थापक अध्यक्ष मनोज दांडगे व पदाधिकाऱ्यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत परिसर अधिक नेटका व सुव्यवस्थित केला.
स्वतःच्या हाताने स्वच्छता करताना विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. शिक्षकवृंदाच्या सहकार्याने जयंती उत्सव उत्साहात पार पडला.
जिल्ह्यात ठिकठिकाणी Sant Gadge Maharaj जयंती उत्साहात
0
9
4
6
3
6
Users Today : 50
Leave a comment