डोणगांव : छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

KHOZ MASTER
1 Min Read

डोणगांव –

डोणगांव नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक स्थापित होणे हा अनेक शिवप्रेमी युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा स्वप्न पूर्ण झाले आहे. आठवडी बाजारातील मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीने मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळ्याचे स्थापना केली.

या स्मारकाचे दि. १२ मार्च रोजी बुलढाणा जिल्हा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष ऋषी प्रतापराव जाधव यांच्या हस्ते महारुद्राभिषेक करण्यात आला. उपस्थित शिवप्रेमी युवकांनी महाआरती करून छत्रपतींचे वंदन केले. यावेळी माजी सरपंच संजय पाटील आखाडे, सरपंच शिवचरण आखाडे, शिवसेना नेते आणि रामेश्वर पळसकर यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. जय शिवराय, हर हर महादेव अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

छत्रपतींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पुष्पवृष्टी करण्यात आली. ऋषी जाधव यांनी केंद्रीय मंत्री तसेच बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या वतीने पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली.

या प्रसंगी आकर्षक विद्युत रोषणाई, फटाके आणि ढोल-ताशांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. उपस्थित युवक आणि नागरिकांनी उत्साह व्यक्त करत शिवरायांच्या घोषणांचा आनंद साजरा केला. ऋषी जाधव यांनी छत्रपतींचे आदर्श आणि विचार डोळ्यासमोर ठेवून समाजकार्य करण्याचे आवाहन केले.

0 9 4 1 5 4
Users Today : 59
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *