घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर आढळल्यास कारवाई : तहसीलदारांचा इशारा

KHOZ MASTER
1 Min Read

जळगाव जामोद

जळगाव जामोद तालुक्यात हॉटेल, उपहारगृह, ढाबा, मंगल कार्यालय तसेच इतर व्यावसायिकांनी घरगुती गॅसचा वापर केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार Pawan Patil यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या निर्देशानुसार जिल्हा व तालुकास्तरावर दक्षता पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाच्या माध्यमातून गॅस एजन्सी, पेट्रोल पंप तसेच व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान कुठल्याही प्रकारची अनियमितता किंवा अफरातफर आढळल्यास संबंधितांवर Essential Commodities Act 1955 अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तसेच नागरिकांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी संबंधितांनी नियमांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. जळगाव जामोद तालुक्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा साठा पुरेसा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असेही तहसीलदारांनी सांगितले.

0 9 4 3 0 9
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *