बुलढाणा –
बंदीजनांच्या मानसिक सबलीकरण व सकारात्मक परिवर्तनाच्या उद्देशाने बुलढाणा जिल्हा कारागृहात ‘हॅपी थॉट्स’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. Tejgyan Foundation यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला कारागृहातील २८८ बंद्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमादरम्यान बंद्यांना सकारात्मक विचारांची प्रेरणा देणारी पुस्तके वितरित करण्यात आली. तसेच जीवनात सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
हा कार्यक्रम Suhas Warke, Yogesh Desai आणि Vaibhav Age यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा जिल्हा कारागृहाच्या अधीक्षक Megha Bahekar या होत्या.
या प्रसंगी तेजज्ञान फाऊंडेशनचे शिवाजी जवरे, डॉ. अजय खर्चे, देवन भोपळे, राजेंद्र ढोंडगे, संतोष मलये, निलेश सोनोने, ज्योती सोनोने व रश्मी खर्चे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
Users Today : 5