सिंदखेडराजा –
Jijabai यांच्या पवित्र जन्मभूमीच्या विकासासाठी तयार करण्यात आलेला स्वतंत्र विकास आराखडा गेल्या १३ वर्षांपासून केवळ कागदावरच असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिजाऊंच्या नावावर मोठमोठ्या घोषणा झाल्या, मात्र प्रत्यक्षात विकासाच्या कामांना गती मिळाली नाही, अशी नाराजी नागरिक व्यक्त करीत आहेत.
२०११ पासून जिजाऊ जन्मस्थळाच्या विकासासाठी विविध बैठका, घोषणा आणि पाहण्या झाल्या. तत्कालीन पालकमंत्री Manohar Naik यांनी या विषयावर पहिली बैठक घेतली होती. त्यानंतर २०१३ मध्ये तत्कालीन पालकमंत्री Hasan Mushrif यांनीही या आराखड्याला गती देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच माजी मंत्री Dr. Rajendra Shingne यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांनी सिंदखेडराजा येथे येऊन प्रत्यक्ष पाहणीही केली होती.
मात्र मंत्रालयातील वित्त, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागांकडे चौकशी केल्यानंतर या विकास आराखड्याची अधिकृत फाईलच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून केवळ घोषणांचा पाऊस पडत असताना प्रत्यक्षात कोणतीही ठोस कृती झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, Purushottam Khedekar यांच्या माध्यमातून जिजाऊ सृष्टी प्रकल्पाचा मोठा विकास झाला आहे. त्याच धर्तीवर सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक वास्तू व जिजाऊ जन्मस्थळाच्या विकासासाठीही पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
जागतिक पर्यटनस्थळ होण्याची क्षमता असलेल्या या ऐतिहासिक नगरीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Users Today : 5