चिखली –
राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या E‑Pik Pahani अंतर्गत पीक नोंदणीसाठी शासनाने ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. रब्बी हंगाम २०२५-२६ साठी मोबाइल अॅपद्वारे पीक नोंदणीची प्रक्रिया १० डिसेंबर २०२५ पासून सुरू करण्यात आली होती.
प्रशासकीय आढाव्यानुसार राज्यातील पीक नोंदणीचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण न झाल्याने ही मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चिखली तालुक्यात सध्या केवळ सुमारे ८४ टक्के क्षेत्राचीच नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची नोंदणी तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे प्रलंबित आहे, त्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पीक नोंदणी वेळेत पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येऊ शकतात. पिकांचे नुकसान झाल्यास मिळणारी शासकीय मदत, विमा दावे तसेच बँकांकडून दिल्या जाणाऱ्या पीक कर्जासाठी सातबारावरील पीक नोंद महत्त्वाची मानली जाते.
तालुक्यात पीक नोंदणी शंभर टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी किंवा ई-पीक पाहणी सहाय्यकांशी संपर्क साधून नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार Vijay Sabde यांनी केले आहे.
Users Today : 5