मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविणार

KHOZ MASTER
1 Min Read

खामगाव 

Election Commission of India यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात लवकरच विधानसभा मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत खामगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्या शंभर टक्के शुद्ध करण्यावर भर दिला जाणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान मतदार यादीतील मयत किंवा दुबार नावे कमी करण्यात येणार असून मतदारांच्या नाव, वय, लिंग तसेच इतर तपशीलांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मतदारांच्या घरोघरी भेट देऊन माहिती पडताळणी करणार आहेत व प्रत्येक मतदाराकडून गणना प्रपत्र भरून घेण्यात येणार आहे.
पडताळणीसाठी मतदारांना सन २००२ च्या मतदार यादीतील स्वतःचे किंवा आई-वडील, आजी-आजोबा यांच्या नावाचा तपशील, पासपोर्ट आकाराचे अद्ययावत रंगीत छायाचित्र तसेच आयोगाने निश्चित केलेल्या १३ कागदपत्रांपैकी आवश्यक कागदपत्र सादर करावे लागणार आहे.
सध्या पूर्वतयारी म्हणून बीएलओकडून सन २००२ च्या मतदार याद्या आणि २९ ऑक्टोबर २०२४ रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्यांचे मॅपिंगचे काम सुरू आहे. त्यामुळे खामगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी या प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.

0 9 4 3 0 9
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *