नांदुरा –
नांदुरा शहरात अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या दोन जणांवर पोलिसांनी कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
स्थानिक शिवाजी चौक परिसरात अवैध दारू विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १६ मार्च रोजी रात्री सुमारे ९ वाजता पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांना पाहताच आरोपीने दुचाकी सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याकडून ९० मिलीच्या देशी दारूच्या संत्रा कंपनीच्या १०० सीलबंद शिश्या (किंमत २,५०० रुपये), एक बॅग व हिरो एक्स्ट्रीम कंपनीची दुचाकी (क्रमांक एमएच-२८-बीएल-९०७६, किंमत सुमारे ६५ हजार रुपये) असा एकूण ६७ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वडनेर भोलजी येथील हॉटेल परिसरात महादेव सखाराम सुषिर (वय ४५, रा. वडनेर भोलजी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून टॅगो पंच देशी दारू कंपनीच्या ९० मिलीच्या ११ शिश्या व एक वायरची थैली असा ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध Maharashtra Prohibition Act कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार ससाने व चिखलकर करीत आहेत.
Users Today : 5