बुलढाणा –
सेसफंड योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांनी २० मार्चपर्यंत पंचायत समिती स्तरावर आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या २० टक्के सेसफंड योजनेअंतर्गत, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ग्रामीण भागातील मागासवर्गीय शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर पाच एचपी विद्युत मोटारपंप, तसेच ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिलांसाठी शिलाई मशीन पुरविण्याची योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेसाठी पंचायत समिती स्तरावर प्राप्त अर्जाची छाननी झाली असून, पात्र अर्जदारांची निवड प्रक्रिया १२ मार्च रोजी ईश्वर चिठ्ठी पद्धतीने पार पडली. निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित पंचायत समितींना पाठविल्या गेल्या आहेत.
लाभार्थ्यांनी संबंधित योजनेचे साहित्य खरेदी करून २० मार्चपर्यंत खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:
- जीएसटी बिल
- प्रतिज्ञापत्र
- स्थळ पाहणी अहवाल (साहित्यासह फोटो)
- इतर आवश्यक कागदपत्रे
निर्धारित मुदतीत कागदपत्रे सादर केल्यास लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळणे सुलभ होईल. मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक गुलाब खरात, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रमोद यंडोले यांनी विहित मुदतीत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून कोणताही लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये.
Users Today : 11