चिखलीत हिंदु राष्ट्र स्थापनेच्या निर्धाराने गुढीपाडवा उत्सव महाराणा प्रताप स्मारकावर गुंजला हिंदुत्वाचा हुंकार

KHOZ MASTER
2 Min Read

चिखली –

चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर, चिखली शहरात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडवा महोत्सव उत्साहात आणि आध्यात्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.

शहरातील हिंदूसूर्य महाराणा प्रताप स्मारक येथे सर्व हिंदु बांधवांनी एकत्र येऊन सामूहिक गुढी उभारली आणि हिंदु नववर्षाचे भव्य स्वागत केले. गुढीपाडवा हा हिंदु धर्मातील तीन मुहूर्तांपैकी एक असून, याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, तसेच हा दिवस विजय आणि चैतन्य प्राप्त करण्याचा दिवस मानला जातो.

महिला शक्तीचा उत्स्फूर्त सहभाग

कार्यक्रमामध्ये महिला धर्मप्रेमींनी सक्रिय सहभाग नोंदवला. यामध्ये शितलताई इंगळे, वैष्णवीताई मोरे, किरणताई सोळंकी, सविताताई चव्हाण, दिपालीताई बांबल, ज्योतीताई मोरे, सृष्टीताई कंडारे यांच्यासह अनेक महिलांनी उपस्थित राहून नववर्षाचे स्वागत केले आणि धर्मकार्यात सक्रिय राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

सामूहिक गुढी उभारल्याने ईश्वरी तत्त्व आणि सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता वाढते, असा संदेश या उपक्रमातून दिला गेला. या प्रसंगी गुढी म्हणजे ब्रह्मध्वजाची विधिवत पूजा करण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीचे प्रसाद येवले यांनी उपस्थित धर्मप्रेमींना गुढीपाडव्याचे ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व समजावले. भारतीय हिंदु संस्कृतीचे जतन व्हावे आणि समाजामध्ये ऐक्य निर्माण व्हावे, या उद्देशाने ही सामूहिक गुढी उभारण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वांनी ‘हिंदु राष्ट्र अर्थात रामराज्य’ स्थापनेची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

या महोत्सवात सहभागी होते: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गणेश चव्हाण, शिवसेनेचे राकेश चोपडा, गोरक्षक ओमराजे गायकवाड, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे राहुल मोरे, इस्कॉनचे स्वरूप भावसार, हरिभाऊ सोळंके.
तसेच नियोजनासाठी पुढाकार घेतला: प्रसाद येवले, सुजित कोरे, अनिकेत पेंढारकर, प्रताप कंडारे, संदीप ठेंग, चेतन गुप्ता, विशाल इंगळे, ऋषी करवंदे, दीपक गाडेकर आणि विजय लाहोरकर, सुधाकर इंगळे.

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *