Sangrampur –
Satpuda Shikshan Sanstha संचालित Kala va Vanijya Mahavidyalaya Varwat Bakal येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल १२ ते १५ मार्च २०२६ दरम्यान Burhanpur तसेच Indore जिल्ह्यातील विविध पर्यटन व ऐतिहासिक स्थळांना भेट देत उत्साहात पार पडली.
या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी इंदोर येथील प्रसिद्ध Lal Bagh Palace, Kamla Nehru Prani Sangrahalaya तसेच शहरातील विविध धार्मिक स्थळांना भेट दिली.
लालबाग पॅलेस हा Ahilyabai Holkar यांच्या होळकर राजवंशाच्या वैभवाचे प्रतीक असलेला ऐतिहासिक राजवाडा आहे. येथे विद्यार्थ्यांनी युरोपियन शैलीतील भव्य वास्तुकला आणि आकर्षक अंतर्भागाचे अवलोकन केले. तसेच लालबाग येथील वनस्पती उद्यानात विविध वनस्पतींचे निरीक्षण करून त्यांची नोंदही घेतली.
यानंतर विद्यार्थ्यांनी कमला नेहरू प्राणी संग्रहालयाला भेट देत विविध प्राणी-पक्ष्यांची माहिती जाणून घेतली. लालबाग महालाच्या बांधकामावेळी वापरलेल्या फर्निचरच्या रंगांमध्ये वापरलेल्या रासायनिक प्रक्रियेबाबत गाईडने दिलेली माहिती विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासपूर्ण ठरली.
सहलीच्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी Maheshwar येथे भेट देऊन ऐतिहासिक किल्ला, पौराणिक शिवमंदिर, अहिल्यादेवी होळकरांची राजगादी आणि Narmada River घाटाचे अवलोकन केले. तसेच नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर बोटिंगचा आनंदही विद्यार्थ्यांनी घेतला.
यानंतर प्रसिद्ध ज्योतिर्लिंग क्षेत्र Omkareshwar Temple येथे भेट देऊन दर्शन घेतल्यानंतर सहल परतीच्या मार्गाला लागली.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी Geeta Textile Mills Private Limited या उद्योगालाही भेट देऊन वस्त्रोद्योगाची माहिती घेतली.
या शैक्षणिक सहलीत महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील एकूण २७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर यांचे मार्गदर्शन लाभले, तर आयोजन प्रा. संतोष म्हसाळ यांनी केले.
सहलीच्या यशस्वीतेसाठी डॉ. मेघा सोळंके, प्रा. सोनाली तायडे, प्रा. जया जाधव, डॉ. व्ही. डी. इंगळे, प्रा. पूजा लोणकर, डॉ. एन. के. मोरे आणि प्रा. श्यामा साबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Users Today : 11