लोणार येथे सहाव्या शाखेचे उद्घाटन; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रतिपादन
Lonar –
शहरातील आर्थिक व्यवहारांना चालना देत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि लघुउद्योजकांना आर्थिक बळकटी देण्याचे महत्त्वाचे कार्य बँका व पतसंस्था करतात. Sharngdhar Urban Credit Society देखील तळागाळातील नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी मोलाचा हातभार लावेल, असा विश्वास केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री Prataprao Jadhav यांनी व्यक्त केला.
लोणार येथे शारंगधर अर्बन क्रेडिट सोसायटीच्या सहाव्या शाखेचे उद्घाटन प्रतापराव जाधव यांच्या हस्ते थाटात पार पडले. यावेळी ते बोलत होते.
पतसंस्थांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, समाजात अनेक पतसंस्था कार्यरत असून त्या लोकांच्या ठेवी स्वीकारून गरजू घटकांना आर्थिक मदत करतात. विशेषतः शेतकरी, छोटे व्यापारी, महिला बचत गट तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात या संस्थांची महत्त्वाची भूमिका असते.
ज्या नागरिकांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज मिळणे कठीण जाते, त्यांच्यासाठी पतसंस्था एक महत्त्वाचा पर्याय ठरतात. त्यामुळे या संस्थांनी प्रामाणिकपणे कर्ज वितरण करून गरजूंपर्यंत आर्थिक सहाय्य पोहोचवावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांनी वेळेवर परतफेड करणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्व घटकांना सक्षम बनविण्याचा उद्देश – डॉ. संजय रायमूलकर
यावेळी माजी आमदार तथा शारंगधर अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष Sanjay Raymulkar यांनी सांगितले की, समाजातील गोरगरीब, शेतकरी, छोटे व्यवसाय करणारे, महिला बचत गट तसेच विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने शारंगधर अर्बनची स्थापना करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज तसेच वाहन कर्जासह विविध प्रकारच्या कर्जसुविधा उपलब्ध करून देऊन समाजातील सर्व घटकांना सक्षम बनवणे हा संस्थेचा प्रमुख हेतू आहे. या नवीन शाखेमुळे लोणार परिसरातील आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होऊन स्थानिक विकासाला गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मान्यवरांची उपस्थिती
या उद्घाटन समारंभाला शाम उमाळकर, खुशालराव मापारी, प्रकाशराव मापारी, बळीराम मापारी, ऋषिकेश जाधव, हिंमतराव सानप, संतोष मापारी, भगवान सुलताने, भूषण पाटील, पोलीस निरीक्षक सदगीर, नंदकिशोर मापारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच नीरज रायमूलकर, किशोर मापारी, विजय मापारी, पंजाबराव मेटांगळे, विजय सानप, शांतीलाल गुगलीया, राजू तांबिले, संजय आटोळे, विठ्ठलराव जाधव, दशरथ जायभाये, पांडुरंग सरकटे, गजानन मापारी, शालिकराम डव्हळे, डॉ. अनिल मापारी, मयूर गोलेच्छा, विजय डोईफोडे, संतोष आघाव, मेहमूद सेठ, पुरुषोत्तम केंद्रे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 11