सोनाळा-टुणकी शिवारात बिबट्याचा हल्ला; हरिण आणि काळविट ठार

KHOZ MASTER
1 Min Read

Sangrampur –

शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

 Sonala व Tunki शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात हरिण आणि काळविट ठार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १८ मार्च रोजी उघडकीस आली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, सोनाळा शिवारातील विजय भगत यांच्या शेत परिसरात प्रथम एक हरिण मृतावस्थेत आढळले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी टुणकी शिवारातील राहुल पुंडे यांच्या शेतात एक काळविट मृतावस्थेत आढळून आले. दोन्ही प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

या भागात बिबट्याचा मुक्तसंचार असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना रात्रीच्या वेळी पाणी देणे तसेच पिकांची निगा राखण्यासाठी शेतात जावे लागते. मात्र, हिंस्त्र प्राण्याचा वावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्याची भीती वाटत आहे.

दरम्यान, परिसरातील नागरिकांनी वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *