दाताळा –
Malkapur तालुक्यातील Ghirni येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, कांदा तसेच मका ही पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
माहितीनुसार, १९ मार्च २०२६ रोजी Gudhi Padwa या सणाच्या दिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जोरदार वाऱ्यामुळे शेतातील उभी पिके आडवी पडली आणि बहारात आलेले मका, गहू, हरभरा व कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले.
सध्या रब्बी हंगामातील ही पिके काढणीच्या उंबरठ्यावर असताना आलेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. महागडी बियाणे, खते आणि रासायनिक औषधांवर मोठा खर्च करून जोपासलेले पीक काही क्षणांत जमीनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर महसूल व कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून पंचनामा करावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Users Today : 11