Buldhana –
जिल्ह्यात केंद्रीय रस्ता निधी (CRF) अंतर्गत नवीन रस्ते मार्गांची निर्मिती करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केंद्रीय आयुष राज्यमंत्री Prataprao Jadhav यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री Nitin Gadkari यांच्याकडे केली आहे.
रस्ते हे देशाच्या प्रगतीचे मुख्य आधार मानले जातात. मजबूत आणि आधुनिक रस्तेमार्गांमुळे आर्थिक विकास, दळणवळण आणि सामाजिक एकत्रीकरणाला चालना मिळते. तसेच कृषी, उद्योग आणि व्यापार क्षेत्राला गती मिळून ग्रामीण भाग शहरांशी जोडला जातो व रोजगाराच्या संधीही वाढतात.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून Buldhana लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारकडून काही महामार्गांची निर्मिती झाली आहे. मात्र अजूनही काही महत्त्वाचे रस्ते सीआरएफ अंतर्गत मंजूर झाल्यास जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होईल, असे Prataprao Jadhav यांनी सांगितले.
याशिवाय Nandura येथील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल किंवा अंडरपास नसल्याने वाहतुकीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या मार्गावरून Jalgaon Jamod व Sangrampur या आदिवासी भागांकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. रेल्वे येईपर्यंत वाहनांना बराच वेळ थांबावे लागते. त्यामुळे येथे लवकरात लवकर उड्डाणपूल किंवा अंडरपास उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या संदर्भात जिल्ह्यातील विकासात्मक रस्ते प्रकल्पांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन Nitin Gadkari यांनी दिल्याची माहिती मिळाली आहे.
Users Today : 11